बेस्ट बसखाली चिरडून २९ वर्षीय व्यक्ती ठार!

By गौरी टेंबकर | Updated: June 28, 2024 15:44 IST2024-06-28T15:43:45+5:302024-06-28T15:44:08+5:30

पोलिसांनी अनोळखी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

A 29 year old man died after being crushed under a BEST bus | बेस्ट बसखाली चिरडून २९ वर्षीय व्यक्ती ठार!

बेस्ट बसखाली चिरडून २९ वर्षीय व्यक्ती ठार!

गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बेस्ट बसने दिलेल्या धडकेत चाकाखाली चिरडून दीपक भंडारी (२९) नामक व्यक्तीचा मृत्यू झाला. याविरोधात बोरिवली पोलिसांनी अनोळखी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

तक्रारदार पोलीस नाईक भाऊदास गांगुर्डे (४२) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २६ जुन रोजी रात्री गस्ती दरम्यान बोरिवलीच्या सुधीर फडके ब्रीज परिसरात एक अनोळखी इसम रक्तबंबाळ झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेच्या मदतीने त्या व्यक्तीला शताब्दी रुग्णालयात हलविले. तिथे त्यांना डॉक्टरने तपासून मयत घोषीत केले. सदर व्यक्तीच्या कागदपत्रांची पडताळणी केली तेव्हा मयत व्यक्तीची ओळख दीपक भंडारी अशी पटली. ते बोरिवली पश्चिमच्या मंडपेश्वर परिसरात राहत असल्याची माहिती आहे. आम्ही घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले असून त्यात अपघात करणाऱ्या बसची ओळख पटली आहे. मात्र त्याच्या चालकाचा शोध आम्ही सध्या घेत आहोत असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: A 29 year old man died after being crushed under a BEST bus

टॅग्स :Accidentअपघात