9th and 10th grade students should also be given free textbooks ...! | ९ वी १० वीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यपुस्तके द्यावीत ...! 

९ वी १० वीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यपुस्तके द्यावीत ...! 

 

मुंबई : महाराष्ट्रातील कामगार , मजूर , शेतकरी , हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांना लॉकडाऊनमुळे अतिशय बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे अश्या परिस्थितीत या वर्षी गणवेश , नोटबुक , पुस्तके विकत घेण्यासाठी पैसा कुठन आणायचा हा सर्व सामान्य जनतेसमोर प्रश्न उपस्थित झाला असून या शैक्षणिक वर्षात तरी ९  वी व १०  वी च्या विद्यार्थ्यांनाही शालेय पाठ्यपुस्तके सरकारने मोफत दयावी अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपा शिक्षक आघाडीने  शासनाकडे मुख्यमंत्री , शिक्षण मंत्री अप्पर सचिव व शिक्षण आयुक्त याना केली आहे.

संपूर्ण राज्यात लॉक डाऊन ची परिस्थिती असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे . ज्याप्रमाणे इय्यता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय पाठ्यपुस्तके मोफत पुरवली जातात त्याचप्रमाणे निदान या शैक्षणिक सत्रात तरी इय्यता ९ वी व १० वी  च्या विद्यार्थ्यांनाही  शालेय पाठ्यपुस्तके मोफत पुरविण्यात यावी जेणेकरून आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थी शालेय पाठ्यपुस्तकापासून वंचित राहणार नाही व त्याला  वेळेवर पाठ्यपुस्तके मिळाली तर त्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होणार नाही व याकरिता खूप मोठ्या आर्थिक तरतुदींची देखील गरज  भासणार नाही, कोविड -१९ च्या नावाखाली असा खर्च विद्यार्थ्यांकरिता सरकारने ठरवले तर नक्की खर्च करता येईल . सरकार विद्यार्थ्यांच्या या रास्त मागणीवर कोणता निर्णय घेते  याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे . त्यामुळे मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ या शैक्षणिक सत्रात तरी इय्यता ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांनाही मिळवून द्यावा अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीच्या माद्यमातून करण्यात आल्याची माहिती  बोरनारे यांनी केली आहे. 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 9th and 10th grade students should also be given free textbooks ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.