मुंबई : दिवाळी आणि छटपूजेसाठी प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेने ९४४ आरक्षित आणि अनारक्षित विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर विभागातून कोल्हापूर, सावंतवाडीसह दक्षिण आणि उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये सोडण्यात येणार आहेत. यामध्ये तिरुवनंतपुरम नॉर्थ, हजरत निजामुद्दीन, सांगानेर, गोरखपूर, कलबुरगी, दानापूर या भागातील प्रवाशांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये वातानुकूलित, शयनयानासह अनारक्षित मिश्र व्यवस्था असलेल्या गाड्यांचा समावेश आहे.
यावर्षी दिवाळी १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असून दिवाळीला तर २२ ऑक्टोबरपासून छट पूजेला सुरुवात होणार आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते भारताच्या विविध भागांमधून वर्षातील ३०० ते ३२० दिवस बहुसंख्य प्रवासी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर अशा भागांमध्ये कामानिमित्त येत असतात.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना
महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘मे आय हेल्प यू’ बूथ उभारण्यात येणार.
प्रवाशांच्या सोयीसाठी विविध स्थानकांवर तिकीट काउंटरची संख्या वाढवणार.
एलटीटी आणि सीएसएमटीसारख्या प्रमुख स्थानकांवर प्रवासी ‘होल्डिंग एरिया’ तयार करणार.
अतिरिक्त आरपीएफ कर्मचारी आणि तिकीट तपासणीस तैनात.
देशभरात जाण्यासाठी विशेष नियोजन मध्य रेल्वेने यंदाच्या दिवाळी आणि छट पूजेसाठी २६ सप्टेंबर पासून २९ नोव्हेंबर पर्यंत विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेन मुंबईसह भारताच्या विविध भागांमध्ये जाणार आहेत. - महाराष्ट्रातील लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड अशा विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी उत्सव विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी करीमनगर, कोचुवेली, काझीपेट, बेंगळुरू आणि इतर ठिकाणांसारख्या विविध ठिकाणी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
रेल्वे प्रशासनाचा निर्णय
सणांनिमित्त ३० ते ४० दिवसांच्या कालावधीत हे प्रवासी मुंबई आणि इतर भागांतून त्यांच्या स्वगृही परतण्यासाठी प्रशासनाने विशेष गाड्यांचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वेने गेल्यावर्षी या कालावधीत एकूण ४,५२१ सेवा चालविल्या होत्या.