Join us

७व्या वेतन आयोगाची थकबाकी ५ हप्त्यांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 06:19 IST

खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर या काळातील सातव्या वेतन आयोगाची थकबाकी पाच हप्त्यांत देण्यात येईल,

मुंबई : खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर या काळातील सातव्या वेतन आयोगाची थकबाकी पाच हप्त्यांत देण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. याचा लाभ खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक विद्यालये व सैनिकी शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, महापालिका, नगर परिषदा , नगरपंचायती यांतील माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होईल. पीएफ योजनेत असलेल्यांची थकबाकी त्यांच्या खात्यांमध्ये जमा होईल, इतरांना ती रोखीने मिळेल.

टॅग्स :पैसा