पायधुनीतील ‘त्या’ लुटारूंकडून ८६ लाखांची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 05:38 IST2018-03-03T05:38:39+5:302018-03-03T05:38:39+5:30
पायधुनी येथील ९८ लाख लूट प्रकरणातील आरोपींकडून, आतापर्यंत ८६ लाखांची रोकड हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे.

पायधुनीतील ‘त्या’ लुटारूंकडून ८६ लाखांची रोकड जप्त
मुंबई : पायधुनी येथील ९८ लाख लूट प्रकरणातील आरोपींकडून, आतापर्यंत ८६ लाखांची रोकड हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे.
पायधुनी परिसरातील व्यापारी नासीर खान यांनी नोकराकडे सोपविलेली ९८ लाखांची रोकड २१ फेब्रुवारी रोजी पळविण्यात आली होती. या प्रकरणी पायधुनी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून, तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासांत मोहम्मद इरफान मन्सुरी (३५), रफिक शेख (३०) मोहम्मद हसन मन्सुरी (३२) या तिघांना बेड्या ठोकल्या. सुरुवातीला ६५ लाखांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली. आतापर्यंत ८६ लाखांची रोकड आरोपींकडून हस्तगत करण्यात आली आहे. उर्वरित रकमेबाबतही त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पायधुनी पोलिसांनी दिली.