Join us

Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:41 IST

Mumbai Traffic: मुंबईकर गणरायाला आज वाजतगाजत देणार निरोप : ३२ ठिकाणी मालवाहू वाहनांना बंदी; तीन हजार वाहतूक पोलिस कोंडी टाळण्यासाठी सज्ज 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लाडक्या बाप्पाला वाजत-गाजत निरोप देत असताना मुंबईतील १२ धोकादायक पुलावरून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त अनिल कुंभारे यांनी केले आहे. भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी मुंबईतील ८४ रस्ते वाहतुकीस बंद करून वाहतूक अन्य मार्गाने वळविली आहे.  ३२ ठिकाणी मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 

मुंबईत गिरगाव, शिवाजी पार्क, जुहू, मालाड मालवणी टी-जंक्शन आणि पवई गणेश घाटसारख्या विसर्जनाच्या मुख्यठिकाणी पोलिस नियंत्रण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशविसर्जनासाठी लाखो भाविक रस्त्यावर उतरणार आहे. मुंबईत वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस आयुक्त, ४ पोलिस उपायुक्त, ८ एसीपी, ६० पोलिस निरीक्षक, १७९ अधिकारी आणि २८२६ कर्मचारी असा एकूण तीन हजार वाहतूक पोलिस सज्ज आहेत.

११२ ठिकाणी नो-पार्किंग पोलिसांनी मुंबईतील ८४ रस्ते वाहतुकीस बंद केले आहे. तसेच १६ ठिकाणी फक्त एका दिशा मार्ग केले असून, ११२ ठिकाणी नो-पार्किंग झोन तयार करण्यात आला आहे. मुंबईच्या ३२ रस्त्यावर मालवाहू वाहनांना बंदी आहे. हे आदेश ६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ७ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. 

१२ धोकादायक पुलांवर काळजी घ्या दक्षिण मुंबईतील नाथालाल पारेख, कॅप्टन प्रकाश पेठे, रामभाऊ साळगावकर, पांडे मार्ग, नेताजी सुभाषचंद्र बोस, जेएसएसरोड, विठ्ठलभाई पटेल मार्ग, बाबासाहेब जयकर, राजाराम मोहन, कावसजी पटेल टॅंक रोड, संत सेना नानूभाई देसाई, सरदार वल्लभभाई पटेल, जिनाभाई मुलजी राठोड, पी. डिमेलो रोड (आवश्यकतेनुसार काक्लीज चौक ते वाडीबंदर जंक्शन), एनए पुरंदरे (उत्तर दक्षिण वाहिनी), दादासाहेब भडमकर, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित रमाबाई, ना. जगन्नाथ शंकरशेट, एम. एस. अली मार्ग, पठ्ठे बापूराव,, जावाजी दादाजी, एआर संगगणेकर मार्गावरील बंद राहणार आहे.   एनएमजोशी मार्ग हा रस्ता दुहेरी मार्गाऐवजी एकदिशा मार्ग असणार आहे. तर, टी एच कटारिया म्हणजेच माटुंगा लेबर कॅम्प रोड बंद केला असून पर्यायी मार्ग सायन हॉस्पिटलकडून येणारी वाहतूक कुंभारवाडा जंक्शन ६० फिट रोड वळविण्यात येईल.

५२ ठिकाणी वॉच टॉवरवाहतूक पोलिसांच्या दिमतीला एनएसएस, नागरी संरक्षण दल, वाहतूक रक्षक, रस्ता सुरक्षा दल रक्षक (महानगरपालिका शिक्षक), हॅम रेडिओ, ३४० स्वयंसेवक, होमगार्ड, जल रक्षक दल व इतर असे ४००० मनुष्यबळ मदतीकरिता असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ५४ क्रेन, ६ रुग्णवाहिकाही महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहे. यासोबतच ५२ ठिकाणी वॉच टॉवर, ध्वनिक्षेपक यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहे. 

टॅग्स :गणेश विसर्जनमुंबईमहाराष्ट्र