‘भाजप’च्या १३७ उमेदवारांमध्ये ७६ महिलांना मिळाली संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:24 IST2026-01-01T15:23:27+5:302026-01-01T15:24:16+5:30
यादीनुसार १३७ उमेदवारांमध्ये १९ गुजराती-मारवाडी असून हिंदीभाषिक साधारण १५ आहेत, दाक्षिणात्य चार आणि एक पंजाबी आहे. यादीत एका मुस्लीम उमेदवाराचाही समावेश आहे.

‘भाजप’च्या १३७ उमेदवारांमध्ये ७६ महिलांना मिळाली संधी
मुंबई : मुंबई भाजपच्या १३७ उमेदवारांची यादी बुधवारी प्रसिद्ध केली. यात ७६ महिला उमेदवारांना संधी देण्यात आली असून, ही संख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे. तर केवळ ६१ पुरुष उमेदवार असल्याने भाजपमध्ये पुढील पाच वर्षे महिला ‘महिलाराज’ असण्याची चिन्हे आहेत.
यादीनुसार १३७ उमेदवारांमध्ये १९ गुजराती-मारवाडी असून हिंदीभाषिक साधारण १५ आहेत, दाक्षिणात्य चार आणि एक पंजाबी आहे. यादीत एका मुस्लीम उमेदवाराचाही समावेश आहे.
बंडखोरीची भीती असल्याने मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये काही उज्ज्वला मोडक, महेश पारकर, प्रकाश गंगाधरे, अनुराधा पेडणेकर, मकरंद नार्वेकर अशा माजी नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आली असून, काही बाहेरून आयात करण्यात आले आहेत. या उमेदवारांची विशेष काळजी घेण्यात आल्याचे दिसून आले. यात तेजस्वी घोसाळकर, चंदन शर्मा, राखी जाधव, रवी राजा यांचा समावेश आहे.