७.५६ कोटींचे अमली पदार्थ हस्तगत, सात केनियनांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 03:40 IST2018-03-24T03:40:25+5:302018-03-24T03:40:25+5:30
दुर्मीळ ‘खट’ नामक अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी केनियाच्या सात नागरिकांना सहार पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडे मिळालेल्या ३०० ग्रॅम अमली

७.५६ कोटींचे अमली पदार्थ हस्तगत, सात केनियनांना अटक
मुंबई : दुर्मीळ ‘खट’ नामक अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी केनियाच्या सात नागरिकांना सहार पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडे मिळालेल्या ३०० ग्रॅम अमली
पदार्थाची किंमत ७ कोटी ५६ लाख रुपये असल्याचे परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांनी सांगितले.
केनियावरून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याच्याकडे काही सुकलेली आयुर्वेदिक पाने सापडली होती.
त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे सहार पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली. चौकशी दरम्यान ती अमली पदार्थाची पाने असल्याचे त्याने कबूल केले. तसेच अजून सहा प्रवासी ही पाने घेऊन
येत असल्याची माहितीदेखील त्याने दिली. त्यानुसार एकूण सात जणांना सहार पोलिसांनी अटक करत त्यांच्याकडून ही पाने हस्तगत केली आहेत.
तोफिक अली, उमर मोहम्मद, अबिद झेन्युअल, मोहम्मद गॅबो, जॅकलिन नॅमवंगे, झकरीये अब्दुल्लाही, अब्राहिम मोहम्मद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.