Join us

गेल्या तीन महिन्यांत ७० प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 20:43 IST

२२ मार्च ते जून महिन्यात वेगवेगळ्या अपघात ६६ पुरुष आणि ४ महिलांना आपला प्राण गमवावा लागला.

मुंबई  - लॉकडाऊनमधील मागील तीन महिन्यांत रेल्वे अपघातात ७० प्रवाशांचा मृत्यू आणि १५ प्रवासी जखमी झाले. यामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना ५० प्रवाशांचा मृत्यू झाला असून हा आकडा सर्वाधिक आहे. 

२२ मार्च ते जून महिन्यात वेगवेगळ्या अपघात ६६ पुरुष आणि ४ महिलांना आपला प्राण गमवावा लागला. तर, १२ पुरुष आणि ३ महिला जखमी झाल्या. रेल्वे रूळ ओलांडताना ४६ पुरुष आणि ४ महिला अशा ५० जणांचा मृत्यू झाला. रेल्वे परिसरात नैसर्गिक कारणाने ११ जणांचा मृत्यू झाला. 

लॉकडाऊनच्या एप्रिल, मे, जून महिन्यांपैकी जूनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.  एप्रिलमध्ये ११, मेमध्ये १८  जूनमध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जुलै महिन्यात मागील दोन दिवसात २ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू ५० 

नैसर्गिक मृत्यू         ११ 

धावत्या ट्रेनमधून पडून  ४ 

विजेचा धक्का लागून   २ 

इतर कारणाने         ३ एकूण      ७० 

लॉकडाऊनच्या काळात एकूण ४६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. सर्वाधिक गुन्हे हे चोरीचे असून ३६ आहेत. 

 

टॅग्स :मुंबईअपघात