वर्सोवा किना-याच्या स्वच्छतेसाठी ‘बिग बी’ने दिले ७० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 05:32 AM2017-12-29T05:32:17+5:302017-12-29T11:39:27+5:30

मुुुंबई : स्वच्छ भारत मोहिमेच्या प्रचारात कार्यरत असलेले महानायक अमिताभ बच्चन यांनी वर्सोव्या किना-यावर राबविल्या जाणा-या स्वच्छता मोहिमेसाठी ७० लाखांची सामग्री दिली आहे.

70 lakhs given to Big B for the cleanliness of Versova Kina | वर्सोवा किना-याच्या स्वच्छतेसाठी ‘बिग बी’ने दिले ७० लाख

वर्सोवा किना-याच्या स्वच्छतेसाठी ‘बिग बी’ने दिले ७० लाख

Next

मनोहर कुंभेजकर 
मुुुंबई : स्वच्छ भारत मोहिमेच्या प्रचारात कार्यरत असलेले महानायक अमिताभ बच्चन यांनी वर्सोव्या किना-यावर राबविल्या जाणा-या स्वच्छता मोहिमेसाठी ७० लाखांची सामग्री दिली आहे. वैयक्तिक निधीतून ही सामग्री घेण्यात आली असून वर्सोवा बीचवरील स्वच्छता मोहिमेचे जनक अफरोझ शाह यांच्याकडे गुरुवारी सुपुर्द केली.
गेल्या दोन वर्षांपासून राबविल्या जाणाºया या मोहिमेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधूनही गौरव केला होता. मात्र महापालिकेकडून कचºयाचा उचलण्यासाठी आवश्यक सहकार्य मिळत नसल्याने शाह यांनी स्वच्छता मोहीम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर अफरोझ शाह यांनी पुन्हा मोहीम सुरू केली.
‘बिग बी’ने आॅगस्ट महिन्यात वर्सोवा बीचला भेट देऊन शाह यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेचे कौतुक करीत त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळी १० वाजता त्यांनी सात बंगला येथील बीचवरील सागरकुटीर या ठिकाणी ७० लाखांचे ट्रॅक्टर आणि डम्पर अफरोझ शाह यांच्याकडे सुपुर्द केले.
‘आपल्या जावयाची सदर सामग्री बनवणारी कंपनी असून आपल्या सूचनेनुसार त्यांनी ती या ठिकाणी पाठविली असल्याचे सांगितले. या वेळी स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर, के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष योगिराज दाभाडकर, नगरसेविका रंजना पाटील आणि ही मोहीम राबवत असलेले वर्सोवा रेसिडंट आॅर्गनायझेशनचे कार्यकर्ते आणि सुपरस्टारला बघायला येथील नागरिक आणि सागरकुटीरचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
>या वेळी अफरोझ शाह हे अमिताभ बच्चन यांचे आभार मानताना म्हणाले, ‘अनेक जण मला भेटतात, या मोहिमेसाठी मदत करू असे सांगतात, पण नंतर मदत काहीच मिळत नाही. मात्र अमिताभ यांनी एका दिवसात निर्णय घेऊन ७० लाख रुपये निधी उपलब्ध करून यंत्रसामग्री दिली.’

Web Title: 70 lakhs given to Big B for the cleanliness of Versova Kina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.