Join us  

मेट्रोच्या डब्यांसाठी ७ कंपन्यांमध्ये चुरस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 5:03 AM

मेट्रो २ -अ आणि मेट्रो-७ साठी लागणार ३७८ डबे

मुंबई : मेट्रो २-अ आणि मेट्रो-७ साठी लागणाऱ्या एकूण ३७८ डब्यांच्या पुरवठ्यासाठी सात कंपन्या पुढे आल्या आहेत. या कामांसाठी मागविण्यात आलेल्या निविदा नुकत्याच दिल्ली येथे उघडण्यात आल्या. या वेळी देशी आणि परदेशी अशा मिळून सात कंपन्यांनी निविदा सादर केल्याचे स्पष्ट झाले आहे.निविदा सादर करणाºया कंपन्यांमध्ये कोरियाची ह्युंदाई रॉटेम, जर्मनीची बंबार्डियर इंडिया अ‍ॅण्ड बंबार्डियर, स्पेनची सी.ए.एफ. इंडिया अ‍ॅण्ड सी.ए.एफ. या परदेशी, तर सी.आर.आर.सी. कॉर्पोरेशन, भारत अर्थ मूव्हर्स, टायटॅगर वॅगन्स , अ‍ॅल्स्टॉम ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड अ‍ॅल्स्टॉम एस.ए. या भारतीय कंपन्यांचा सामावेश आहे.विशेष सुविधांवर भरप्रत्येकी सहा डब्यांचा समावेश असणाºया, गुणवत्ताप्राप्त ६३ गतिमान मेट्रो पुरवण्याची कार्यवाही यशस्वी निविदाधारकास करायची आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना आरामशीर प्रवास करता यावा, या दृष्टीने या मेट्रोमध्ये खास सुविधा देण्यात येणार आहेत.यातील सर्व डबे वातानुकूलित, पर्यावरणस्नेही, सीसीटीव्ही सुविधा, अत्याधुनिक स्वरूपाची ब्रेकिंग सिस्टीम आणि सुरक्षेच्या अन्य सुविधांनी परिपूर्ण असणार आहेत.प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या गाड्या सीबीटीसी या विशेष सिग्नल प्रणालीवर चालणार असून, यामध्ये प्लॅटफॉर्म स्क्रीन, डोअरअप सुविधेचाही समावेश करण्यात आला आहे. या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेली मूल्यांकन समिती यशस्वी निविदाधारकाची निवड लवकरच करणार आहे.दोन्ही मार्ग वेळेत पूर्ण करूनिविदा प्रकियेसाठी आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला. हे दोन्ही मेट्रो मार्ग ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी या वेळी दिली. सुरक्षित, पर्यावरणस्नेही आणि जागतिक गुणवत्तेचे मेट्रो मार्गाचे जाळे मुंबईत निर्माण करण्याचे ध्येय असल्याचेही आर. राजीव यांनी सांगितले.

टॅग्स :मेट्रोमुंबई