तब्बल ६४ लाखांची रेल्वे तिकिटे ब्लॅक; दलालांना लगाम लावण्यासाठी मध्य रेल्वेची मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 10:07 AM2023-12-12T10:07:37+5:302023-12-12T10:08:51+5:30

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना लगाम लावण्यासाठी मध्य रेल्वेने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. 

64 lakh train tickets black 128 broker inside Central Railway's drive to rein in mumbai | तब्बल ६४ लाखांची रेल्वे तिकिटे ब्लॅक; दलालांना लगाम लावण्यासाठी मध्य रेल्वेची मोहीम 

तब्बल ६४ लाखांची रेल्वे तिकिटे ब्लॅक; दलालांना लगाम लावण्यासाठी मध्य रेल्वेची मोहीम 

मुंबई : लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना लगाम लावण्यासाठी मध्य रेल्वेने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. 

मुंबई विभागात आरपीएफने गेल्या आठ महिन्यांत एकूण १२८ तिकीट दलालांना पकडले आहे. त्यांच्याकडून ६४ लाख ६१ हजार रुपयांची २,८५० तिकिटे जप्त केली.गेल्या महिन्यात रेल्वे तिकिटांची अवैध विक्री करणाऱ्यांवर १० गुन्हे नोंदविण्यात आले असून, या कारवाईत आरपीएफने तीन लाख ७८ हजारांची १७९ ई-तिकिटे जप्त केली आहेत. 

नोव्हेंबरमध्ये ११ जणांना अटक :

 मुंबई विभागातील आरपीएफ पोलिसांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये रेल्वे दलालीच्या एकूण १० प्रकरणांचा छडा लावला. 
 रेल्वे कायद्यांतर्गत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. दलालांकडून ३,७८,७४७ रुपये किमतीची १७९ तिकिटे जप्त करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

Web Title: 64 lakh train tickets black 128 broker inside Central Railway's drive to rein in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.