विद्युत प्रवाह सुरु असलेली वायर पडल्याने 6 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 21:04 IST2019-03-25T21:01:30+5:302019-03-25T21:04:44+5:30
जखमींपैकी एकाला उपचार करून घरी सोडण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विद्युत प्रवाह सुरु असलेली वायर पडल्याने 6 जण जखमी
मुंबई - मानखुर्दमधील एकता नगर येथील घरावर उच्च विद्युत प्रवाह असलेली तार पडून घराच्या भिंतीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले. जखमींना गोवंडी शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाला उपचार करून घरी सोडण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आज मानखुर्द मंडाला येथील एका घरावर उच्च विद्युत प्रवाह वाहून नेणारी तार तुटून पडली. ही वायर उच्च विद्युत व्होल्टेजची असल्याने घराची भिंत कोसळली. या घटनेत धीरज यादव (14), अरबाज शेख (14), प्रशांत दिलीप पवार (25), नीलेश यादव (14), विपुल धनश्याम पाठक (3) जखमी झाले. त्यांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून विपुल पाठक यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.