Join us

मुंब्रा येथे पाचवीही मुलगीच झाल्याने केली हत्या; अटकेतील आई- वडिलांनी दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 08:39 IST

अवघ्या दीडवर्षीय मुलीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून तिला या दाम्पत्याने गंभीर जखमी केले होते.

मुंबई: चार मुला-मुलींनंतर पाचवीही मुलगीच झाली. तिचा सांभाळ कसा करायचा? मोठी झाल्यावर तिच्या लग्नात हुंडा कसा द्यायचा? अशा अनेक प्रश्नांनी मनात घर केल्यामुळे आपण दीड वर्षांच्या लबीबा या मुलीची हत्या केल्याची कबुलीच जाहीद शेख (३८) आणि त्याची पत्नी नूरानी (२८) यांनी दिल्याची माहिती कळवा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त उत्तम कोळेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

अवघ्या दीडवर्षीय मुलीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून तिला या दाम्पत्याने गंभीर जखमी केले होते. त्यानंतर तिला आजार झाल्याचा बहाणा करीत तिच्यावर उपचार केले. मात्र, उपचारादरम्यानच तिचा १८ मार्च २०२४ रोजी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर १९ मार्च रोजी पहाटे २:३० वाजण्याच्या सुमारास मुंब्यातील कब्रस्थानामध्ये तिला परस्पर दफनही केले. तिच्या संशयास्पद मृत्यूची माहिती तिच्या फोटोसह संतोष महादेव नामक व्यक्तीने ४ एप्रिल २०२४ रोजी मुंब्रा शवविच्छेदन अहवालात मुलीच्या डोक्यावर शस्त्राने वार केल्याचे आढळले. जाहीद आणि नूरानी या दाम्पत्याला १० एप्रिल रोजी अटक करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या दाम्पत्याने अखेर दोन मुले आणि तीन मुली असल्यामुळे या धाकट्या मुलीचा खून केल्याची कबुली दिली. पहिल्या मुलींच्या खुनाचाही प्रयत्न केला होता, अशी कबुली त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच आधारे या संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय दवणे, सहायक पोलिस निरीक्षक कोरडे यांच्या पथकाने केला. मुलीचा मृतदेह दफनभूमीतून बाहेर काढून शवविच्छेदन केले. त्यानंतर विधिवत कौसा कब्रस्थानात ते दफन करण्यात आले.

टॅग्स :मुंबईपती- जोडीदारगुन्हेगारी