मुंबईत ५४५ कोरोनाबाधित; १३ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:06 IST2021-07-16T04:06:29+5:302021-07-16T04:06:29+5:30
मुंबई - मुंबईत गुरुवारी ५४५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत रुग्णवाढीचा ...

मुंबईत ५४५ कोरोनाबाधित; १३ मृत्यू
मुंबई - मुंबईत गुरुवारी ५४५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर अवघा ०.०७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधीही ९४८ दिवसांवर पोहोचला आहे.
आतापर्यंत मुंबईत सात लाख २९ हजार ७९५ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सात लाख चार हजार ७६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ६६७ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या सात हजार १२ सक्रिय रुग्ण आहेत. गुरुवारी मृत्युमुखी पडलेल्या १३ रुग्णांपैकी आठ रुग्णांना सहव्याधी होत्या. दिवसभरात ३६ हजार ५६८ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत ७६ लाख ६५ हजार ३७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.