मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील ५४ रस्ते बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 11:51 AM2020-09-01T11:51:50+5:302020-09-01T11:52:15+5:30

५६ रस्त्यावर एकेरी  वाहतूक असणार आहे तर ९९ ठिकाणी पार्किंगला बंदी आहे.

54 roads in the Mumbai city will remain closed on the backdrop of Ganesh immersion | मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील ५४ रस्ते बंद राहणार

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील ५४ रस्ते बंद राहणार

Next

मुंबई: गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईतील ५४ रस्तेबंद राहणार आहेत.रस्ते वाहतुकीवरील निर्बंध बुधवार सकाळी ६ पर्यंत लागू असणार आहेत अशी माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

विसर्जन काळात उड्डाणपूलावर गर्दी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून रस्ते वाहतूक बंद करण्यात आली आहे.विशेषतः करीरोड आणि चिंचपोकळी उड्डाणपुलावर १६ टनपेक्षा जास्त वाहतुकीला परवानगी नाही असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. उड्डाणपुलावर ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी नाही. हे नियम  १४ रेल्वेपुलासाठीही लागू  असणार आहे.घाटकोपर ,करीरोड,चिंचपोकळी,मरिन लाईन्स,सेंडहर्स्ट रोड,फ्रेंच,फोल्कलॅन्ड, केनडी,बेलासीस, महालक्ष्मी, प्रभादेवी आणि दादर टिळक पूल यांचा समावेश आहे.

५६ रस्त्यावर एकेरी  वाहतूक असणार आहे तर ९९ ठिकाणी पार्किंगला बंदी आहे.वाहतूक पोलिसांना सोशल डिस्टन्सिंग ,मास्क, हँड ग्लोव्हज याकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  मेट्रोकामांमुळे काही मार्गांच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. डीबी मार्गावर नवजीवन सोसायटी ते ग्रँटरोड दरम्यान वाहनांना बंदी आहे.

याशिवाय काही महत्त्वाचे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. यामध्ये व्हीपी रोड,(टॅंक ते भालचंद्र को)गिरगाव रोड(प्रिन्सेस स्ट्रीट ते एसव्हीपी मार्ग), सेंडहर्स्ट रोड(मरीन ड्राईव्ह जंक्शन ते ऑपेरा  हाऊस,पार्थना समाज), महापालिका मार्ग(सीएसटी जंक्शन ते मेट्रो सिनेमा) ,ग्रँट रोड पुलाच्या दोन्ही बाजू, एलबीएस मार्ग(टॅंक रोड जंक्शन ते शिवाजी तलाव),टिळक उड्डाणपुल(खोदादाद सर्कल ते कोतवाल उद्यान), लिंकिंग रोड(सांताक्रूझ पोलीस स्थानक जंक्शन ते खार टेलिफोन जंक्शन दक्षिण वाहिनी) बीए रोड (भारतमाता जंक्शन ते बावला कंपाउंड) या मार्गांचा समावेश आहे

Web Title: 54 roads in the Mumbai city will remain closed on the backdrop of Ganesh immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.