आरेतील मेट्रो कारशेडचे 54 टक्के काम पूर्ण, डिसेंबरपर्यंत मार्गी लागणार

By सचिन लुंगसे | Published: March 24, 2023 06:43 AM2023-03-24T06:43:01+5:302023-03-24T06:43:37+5:30

विशेष म्हणजे सीप्झ ते बीकेसी या पहिल्या टप्प्यावर मेट्रो सुरू करण्यासाठी कॉर्पोरेशन वेगाने कारशेडचे काम करत असून, डिसेंबर २०२३ पर्यंत कारशेडचे काम जवळजवळ पूर्ण होईल, असा दावाही करण्यात आला आहे. 

54 percent work of metro carshed in Aarey is complete, will be ready by December | आरेतील मेट्रो कारशेडचे 54 टक्के काम पूर्ण, डिसेंबरपर्यंत मार्गी लागणार

आरेतील मेट्रो कारशेडचे 54 टक्के काम पूर्ण, डिसेंबरपर्यंत मार्गी लागणार

googlenewsNext

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या देशातील पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रो मार्ग ३ चे काम वेगाने सुरू असून, या मेट्रोच्या ज्या कारशेडमुळे मोठा वाद झाला होता; त्या आरे कारशेडचे काम ५४ टक्के पूर्ण झाले आहे, असा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केला आहे. 
विशेष म्हणजे सीप्झ ते बीकेसी या पहिल्या टप्प्यावर मेट्रो सुरू करण्यासाठी कॉर्पोरेशन वेगाने कारशेडचे काम करत असून, डिसेंबर २०२३ पर्यंत कारशेडचे काम जवळजवळ पूर्ण होईल, असा दावाही करण्यात आला आहे. 

नव्या वर्षांत मेट्रो ३ चा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर जून २०२४ पर्यंत बीकेसी ते कुलाबा हा उर्वरित दुसरा टप्पा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. आरेतील सारीपूत नगर येथील लास्ट बॉटल नेकच्या कामासाठी महापालिकेकडे झाडे तोडण्याची परवानगी मागण्यात आली होती. महापालिकेने परवानगी दिली असून, सुमारे १७० झाडे तोडली जातील.

- ट्रॅक, सिग्नलिंग, सिव्हिल वर्क अशी बहुतांशी कामे मार्गी लागत आहेत. आरे कारशेडसाठी सुमारे १ हजार कामगार काम करत आहेत.
- महिन्याला २ मेट्रो येणार आहेत. डिसेंबरपर्यंत ९ मेट्रो दाखल होतील. एकूण ३१ मेट्रो दाखल होणार आहेत. मेट्रोचा टेस्ट ट्रॅक ६०० मीटर आहे.

मेट्रो ३ साठी दाखल होणाऱ्या प्रत्येक मेट्रोची चाचणी घेतली जात आहे. सप्टेंबरपर्यंत मेट्रो चालविणार असून, या कामाच्या चाचण्या होतील. बीकेसी ते सीप्झ ट्रायल टेस्टिंग केली जात आहे. 
- एस. के. गुप्ता, प्रकल्प संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन 

Web Title: 54 percent work of metro carshed in Aarey is complete, will be ready by December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.