Join us  

महाराष्ट्रातील तब्बल ५३ नद्या प्रदूषितच; पेच पंचगंगेचा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 5:23 AM

राज्यातील तब्बल ५३ नद्या प्रदूषित असून, गोदावरी, मिठी, मोरना, वैनगंगा या सर्वांत प्रदूषित आहेत, तर पंचगंगा, उमोडी व वशिष्टी नद्या स्नानास योग्य असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे.

- सचिन लुंगसेमुंबई : राज्यातील तब्बल ५३ नद्या प्रदूषित असून, गोदावरी, मिठी, मोरना, वैनगंगा या सर्वांत प्रदूषित आहेत, तर पंचगंगा, उमोडी व वशिष्टी नद्या स्नानास योग्य असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. बीओडीचे प्रमाण तीनपेक्षा जास्त असल्यास पाणी प्रदूषित मानले जाते. राज्यातील नद्यांत बीओडीचे प्रमाण तीन ते ३0 पर्यंत आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मते गोदावरी, मिठी, मोरना, वैनगंगा या सर्वाधिक प्रदूषित आहेत. भीमा, कालु, कुंडलिका, मुठा नद्या त्याखालोखाल असून, नंतर इंद्रायणी, कन्हन, मुळा, मुळा-मुठा, पवना, पेढी, पूर्णा, वर्धा यांचा क्रमांक लागतो.तुलनेने कमी प्रदूषित नद्यांत दारणा, गिरणा, गोमाई, कान, कोलार, कृष्णा, नीरा, पांझरा, पातळगंगा, पेनगंगा, रंगावली, सीना, तापी, तितूर, वेल तर त्याहून कमी प्रदूषित नद्यांत अंबा, भातसा, बिंदूसार, बोरी, चंद्रभागा, घोड, हिवरा, कोयना, मांजरा, मोर, पेल्हार, सावित्री, सूर्या, तानसा, उल्हास, वैतरणा, वेण्णा, वाघूर या नद्या आहेत.पेच पंचगंगेचापंचगंगेत सातत्याने सांडपाणी सोडले जात आहे. जी नदी वाहती असते; त्या नदीत प्रदूषणाचे प्रमाण कमी असते. पंचगंगेचा विचार करता जेथे शहराचे, गावाचे सांडपाणी नदीत सोडले जाते आहे, त्या ठिकाणी प्रदूषण आढळते. इचलकरंजीपासून पुढील भागात प्रदूषणाची समस्या आहे. इचलकरंजीपर्यंत मागील वर्षी फारसे प्रदूषण आढळले नाही, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे देण्यात आली.

टॅग्स :नदीमहाराष्ट्र