Join us  

काँग्रेसवर 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार; भूखंड घोटाळ्याच्या आरोपानंतर भाजपा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 6:29 PM

मुख्यमंत्र्यांवर आरोप करणं हास्यास्पद

मुंबई -  नवी मुंबईतील सिडकोमध्ये भ्रष्ट्राचार केल्याचा काँग्रेसने केलेला आरोप भाजपाने फेटाळून लावला आहे. सिडकोमधील 1767 कोटी रुपये किमतीच्या 24 एकर जमिनीची अवघ्या तीन कोटी रुपयांना व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून भाजपावर करण्यात आला  होता. याप्रकरणावरुन काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. आज भाजपाकडून पत्रकार परिषद घेत सर्व आरोपाचे खंडण करत काँग्रेसवर 500 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. उद्या सकाळी भाजपाकडून अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येणार आहे.  भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आणि आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत घेतली. 

काँग्रेसचे सर्व आरोप खोटे, प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींचं वाटप जिल्हाधिकारी करतात, त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर आरोप करणं हास्यास्पद आसल्याचे यावेळी भाजपाकडून सांगण्यात आले. काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. बिनबुडाचे आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांविरोधात 500 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

काँग्रेसकडून करण्यात आलेले आरोप 

  1. १७६७ कोटींचा भूखंड अवघ्या तीन कोटी रुपयांना व्यवहार
  2. सर्वे नंबर 183/CD, रांजनपाडा, खारघर येथील जमिनीचा व्यवहार
  3. एकाच दिवसात सर्वे, भूसंपादन आणि हस्तांतरण झाले
  4. सिडकोची जमीन असूनही, तहसीलदारांकडून हस्तांतरण
  5. सिकडोकडून त्यावर आक्षेपही घेण्यात आला नाही
  6. दीड वर्ष लागणारे व्यवहार एका दिवसात पूर्ण झाले
  7. सिडको-नगरविकास आणि बिल्डर यांचे साटेलोटे
  8. मनीष भतिजा, संजय भालेराव यांच्या नावाने जमिनीची खरेदी विक्री 
  9. मनीष भतिजा हा पॅराडाइज बिल्डरचा मालक 
  10. पॅराडाइज बिल्डरवर सरकारचा वरदहस्त
  11. व्यवहारात प्रसाद लाड यांचाही सहभाग
टॅग्स :भाजपाकाँग्रेस