मतदान करा, फरसाणावर 50 टक्के सूट मिळवा! भांडुपमध्ये पुन्हा ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 18:32 IST2019-04-04T18:31:06+5:302019-04-04T18:32:07+5:30

मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोग, विविध सामाजिक संस्था या जनजागृती करत असतात.

50 percent discount after voting from Bhandup's sweet mart | मतदान करा, फरसाणावर 50 टक्के सूट मिळवा! भांडुपमध्ये पुन्हा ऑफर

मतदान करा, फरसाणावर 50 टक्के सूट मिळवा! भांडुपमध्ये पुन्हा ऑफर

मुंबई : मतदान जनजागृतीनंतर मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी भांडूपच्या एका फरसाण विक्रेत्याने पुन्हा एकदा धमाकेदार ऑफर आणली आहे. मुंबईमध्ये 29 एप्रिलला मतदान करा आणि 30 एप्रिलला 50 टक्क्यांच्या सवलतीने बेकरीमधील खाद्यपदार्थ घेऊन जा असा फलकच त्यांनी लावला आहे.

 
 मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोग, विविध सामाजिक संस्था या जनजागृती करत असतात. तर काही व्यक्ती देखील वैयक्तीत पातळीवर नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे म्हणून प्रयत्न करत आहेत. यातच, भांडुपच्या स्वस्तिक फरसाण मार्टमध्ये अशी ऑफर जाहीर जाल्याने सर्वांच्याच नजरा त्या फलकावर जाताना दिसल्या. 


गेल्या लोकसभा निवडणुकीतही त्याने अशाच प्रकारे सवलत दिली होती. तेव्हा दोन हजार पेक्षा जास्त मतदार बेकरीत धडकले होते. यावेळी देखील मतदारांनी पुढे यावे म्हणून हा छोटासा प्रयत्न असल्याचे फरसाण मार्टचे मालक किर्ती शहा यांनी सांगितले.

Web Title: 50 percent discount after voting from Bhandup's sweet mart