Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टार प्रजातीचे ५ कासव जप्त, २ आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 05:29 IST

शिवडी पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देशनिवारी शिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना रे रोड रेल्वे स्थानकाच्या पुलाखाली पोलिसांना दोघेजण दुचाकीवर पिशवी मध्ये कासव घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले

मुंबई : शिवडी पोलिसांनी स्टार प्रजातीच्या कासवांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या आरोपींकडून स्टार प्रजातीचे पाच कासव तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी जप्त केली आहे. 

शनिवारी शिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना रे रोड रेल्वे स्थानकाच्या पुलाखाली पोलिसांना दोघेजण दुचाकीवर पिशवी मध्ये कासव घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. याबद्दल या दोघांकडे विचारपूस केली असता त्यांनी हे कासव हैदराबाद येथून मुंबईत तस्करीसाठी आणले असल्याची कबुली दिली. हे रॅकेट आंतरराष्ट्रीय स्तरावर चालत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. याप्रकरणी या आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेले कासव प्लांट अँड ॲनिमल वेलफेअर सोसायटी - मुंबई यांच्याकडे वैद्यकीय तपासणीसाठी तसेच पुढील देखरेखीसाठी सोपविण्यात आले आहेत.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी