Join us

मुंबईत भोपळाही न फोडलेल्या ५ शाळा; शून्य टक्के निकाल कुणाचा लागला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 02:52 IST

मुंबई विभागातून परीक्षेला एकूण तीन लाख ३५ हजार ५९९ विद्यार्थी बसले. त्यापैकी तीन लाख २१ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मुंबई विभागाचा राज्यात तिसरा क्रमांक आला आहे. मुंबई विभागात १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या एक हजार ५७९, तर शून्य टक्के निकाल लागलेल्या फक्त पाच शाळा आहेत, असे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अहवालातून  पुढे आले आहे.

मुंबई विभागातून परीक्षेला एकूण तीन लाख ३५ हजार ५९९ विद्यार्थी बसले. त्यापैकी तीन लाख २१ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

‘कॉपीला आळा घातल्याने रिझल्ट चांगला’

यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेकरिता  विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा आणि स्थानिक अधिकारी सर्वांनीच नेटाने प्रयत्न केले आहेत. कॉपीला आळा घालण्याचा भरपूर प्रयत्न केला. त्यामुळेच मुंबई विभागाचा निकाल चांगला लागला आहे. अधिकृतपणे मुंबई विभागात शून्य टक्के निकालाच्या केवळ पाच शाळा आहेत, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी सांगितले.

शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळा

एस. जी. राणे हायस्कूल, मुंब्रा (ठाणे) शारदा विद्यानिकेतन घणसोली, नवी मुंबई (ठाणे)अष्टमी हायस्कूल, अष्टमी- रोहा, (रायगड) मुरबाड राणे नाईट हायस्कूल, गोरेगाव,( मुंबई)दौलत शिक्षण संस्था मालाड, (मुंबई)

 

टॅग्स :दहावीचा निकालशिक्षण