जुहू समुद्रकिनाऱ्यावर ५ जण बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 19:22 IST2018-07-05T19:18:00+5:302018-07-05T19:22:47+5:30
१ जण सापडला, चार जण बेपत्ता

जुहू समुद्रकिनाऱ्यावर ५ जण बुडाले
मुंबई - आज दुपारी ५ वाजणच्या सुमारास जुहू समुद्र किनाऱ्यावरील गोदरेज चौपाटी व गांधीग्राम चौपाटीदरम्यान पाच जण बुडाले असून त्यापैकी १ जण सापडला असून अन्य चार जण बेपत्ता असल्याची माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानआणि पोलीस अन्य बेपत्ता इसमांचा शोध घेत आहेत. अंधेरी पश्चिम येथील डी. एन, नगरमधील डोंगरावरती राहणारे फरदिन सौदागर (वय १७), सोहेल शकील खान (वय -१७), फैसल शेख (वय ०- १७), नाझीर गाझी (वय - १७) व वसीम सलीम खान (वय - २२) हे तरुण चौपाटीवर पोहण्यासाठी आले होते. दरम्यान, समुद्राला भरती असल्याने ते बुडाले. मात्र, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या शोधकार्यानंतर वसीम खान हा तरुण सापडला. तर इतर तरुणांचा शोध सुरु आहे.