Join us

नागपाडा इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबियांना मिळणार ५ लाखांची मदत; अस्लम शेख यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 20:51 IST

या दुर्घटनेत एकुण २ जण जखमी झाले असून एका ७० वर्षांच्या वृद्धेसह १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे.

मुंबई : मुंबईतील नागपाडा परिसरातील शुक्लाजी रोडवरील अब्दुल रहमान इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. गुरुवारी दुपारी झालेल्या या दुर्घटनेत एकुण २ जण जखमी झाले असून एका ७० वर्षांच्या वृद्धेसह १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे.

 या घटनेबद्दल माहिती मिळताच अस्लम शेख यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. गृहनिर्माणमंत्री  जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन दुर्घटनाग्रस्तांची तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था करण्याचा निर्णय आठवड्याभरात  घेणार असल्याचे ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत त्यांनी  जिल्हा प्रशासनास सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत काॅंग्रेस आमदार अमिन पटेल व  प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :मुंबईइमारत दुर्घटना