४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 07:10 IST2025-12-27T07:10:01+5:302025-12-27T07:10:20+5:30
मुंबई महापालिकेत ९ लाख ३३ हजार १५७ मतदार दुबार आहेत. यापूर्वी हा आकडा ११ लाख १ हजार ५०७ एवढा होता.

४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील ११ लाख १ हजार ५१६ संभाव्य दुबार मतदारांपैकी केवळ १५ टक्के म्हणजे १ लाख ६८ हजार ३५७ हे दुबार असल्याचे पुनर्पडताळणीत अंतिम झाले आहे. मात्र यांपैकी केवळ २८ टक्के म्हणजे ४८ हजार ६२८ जणांनी दुबार मतदान करणार नसल्याचे महापालिका कर्मचाऱ्यांना फॉर्म अ (जोडपत्र) लिहून दिले आहे. त्यामुळे अशा अन्य मतदारांच्या नावापुढील ‘डबल स्टार’ कायम ठेवण्यात येणार आहे. मतदानाच्या वेळी त्यांच्याकडून केंद्रावर हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेत ९ लाख ३३ हजार १५७ मतदार दुबार आहेत. यापूर्वी हा आकडा ११ लाख १ हजार ५०७ एवढा होता.
फक्त १५ टक्के दुबार मतदार
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी थेट १,२६,६१६ घरांना भेट देऊन पडताळणी केली. यांपैकी ४८,३२८ मतदारांनी फॉर्म अ (जोडपत्र) सादर केले. या फॉर्ममध्ये, दुबार मतदारांनी एकाच प्रभागात मतदान करण्याची इच्छा दर्शविली. राज्य निवडणूक आयोगाने सादर केलेल्या यादीत फक्त १५ टक्के दुबार मतदार आढळल्याचे महापालिकेने नोंदवले आहे. एल वॉर्ड, के पश्चिम वॉर्ड आणि आर सेंट्रल वॉर्डमध्ये सर्वाधिक दुबार मतदार आढळले.
वॉर्ड दुबार जोडपत्र
मतदार भरले
ए २४२१ ७५३
बी १०७६ २०९
सी १५७५ ११७७
डी ५२५२ १३७२
इ ३५६८ १४११
एफ उत्तर ५८६० १५२४
एफ दक्षिण ४४३७ २१८९
जी उत्तर ५९०९ १८९८
जी दक्षिण ६१९८ ४५१०
एच पूर्व ६६७२ १३८०
एच पश्चिम ३७५० १८७३
के पूर्व २५५६ १९७७
के पश्चिम २७६२ ३२०४
वॉर्ड दुबार जोडपत्र
मतदार भरले
एल १६५३२ २८१५
एम पूर्व ७८६३ १७४३
एम पश्चिम ५२०६ १४७२
एन ८०१२ २३०५
पी पूर्व ३६८० ११९०
पी उत्तर ७६२६ २३४६
पी दक्षिण ७९६४ ९०६
आर मध्य ८८०५ २६२३
आर उत्तर ४९८४ १४५४
आर दक्षिण ११६१८ १९०३
एस ९०७८ ३८१३
टी ३३४४ १२२१
एकूण १,६८,३५७ ४८६२८