४,१६५ उमेदवारी अर्जांचे पहिल्याच दिवशी वितरण; सर्वाधिक खरेदी गोवंडीत; एकही अर्ज दाखल नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:16 IST2025-12-24T12:16:06+5:302025-12-24T12:16:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी २३ निवडणूक अधिकारी कार्यालयातून ४ ...

४,१६५ उमेदवारी अर्जांचे पहिल्याच दिवशी वितरण; सर्वाधिक खरेदी गोवंडीत; एकही अर्ज दाखल नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी २३ निवडणूक अधिकारी कार्यालयातून ४ हजार १६५ उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात आले. पहिल्या दिवशी कोणाकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. सर्वाधिक उमेदवारी अर्जांचे वाटप गोवंडी, मानखुर्द परिसराच्या ‘एल’ प्रशासकीय विभागातून झाले असून, त्यांची संख्या ४१९ आहे.
पालिकेकडून २३ निवडणूक अधिकारी नेमले आहेत. या संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयांतून २३ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२५ यादरम्यान कार्यालयीन वेळेत, तर ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज उपलब्ध होणार आहेत.
२५ आणि २८ डिसेंबर उमेदवारी अर्ज उपलब्ध केले जाणार नाहीत किंवा स्वीकारले ही जाणार नाहीत, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आवश्यक प्रशासकीय यंत्रणा, कर्मचारी तसेच तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.