मुंबईत आतापर्यंत सापडले ४१,०५७ दुबार मतदार, दुबार नावांमध्ये होणार; १५ ते २० टक्केपर्यंत घट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 05:51 IST2025-12-11T05:50:29+5:302025-12-11T05:51:19+5:30
पालिकेने एका विभाग कार्यालयाच्या हद्दीत २५० कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली. यादीमध्ये ११ लाख १ हजार दुबार व त्यापेक्षा जास्त नावे असलेले मतदार आढले होते.

मुंबईत आतापर्यंत सापडले ४१,०५७ दुबार मतदार, दुबार नावांमध्ये होणार; १५ ते २० टक्केपर्यंत घट !
मुंबई : निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये सुमारे ११ लाख १ हजार दुबार नावे होती. मात्र मुंबई महापालिकेने प्रत्यक्षात तपासणी केली असता पालिकेच्या २६ प्रभागांमध्ये २ लाख २५ हजार ६८ मतदारांची दुबार नावे दिसून आली. यापैकी ५० टक्के मतदारांची तपासणी केली असता यात आतापर्यंत ४१ हजार ५७ दुबार मतदार सापडले. त्यामुळे उर्वरित तपासणीनंतर १५ ते २० टक्केपर्यंत दुबार नावे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पालिकेने एका विभाग कार्यालयाच्या हद्दीत २५० कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली. यादीमध्ये ११ लाख १ हजार दुबार व त्यापेक्षा जास्त नावे असलेले मतदार आढले होते. त्यानंतर पालिकेने २६ विभाग कार्यालयात दुबार नावांची शहानिशा केली असता २ लाख २५ हजार ६८ दुबार नावे दिसली. उर्वरित कमी झालेली नावे वेगवेगळ्या मतदाराची होती. ही तपासणी मतदाराचे नाव व त्यांच्या फोटोवरून केली. त्यामुळे दुबार मतदारांची संख्या घटल्याचे पालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या वतीने सध्या प्रभागनिहाय शोध सुरू असून येत्या पाच दिवसांमध्ये ही शोधमोहीम पूर्ण होणार आहे. त्यामुळे मुंबईत प्रत्यक्षात किती दुबार मतदार असतील हे समजेल, असेही जोशी यांनी सांगितले.
मतदार यादीबद्दल १० हजार ६८८ तक्रारी
मतदार यादीतील चुकांबाबत १० हजार ६८८ तक्रारी आतापर्यंत प्राप्त झाल्या असून यात दुबार नावासंदर्भात ८२९ तक्रारी होत्या. यापैकी १० हजार ६६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले.
या तक्रारीच्या आधारावर नेमकी तक्रार कुठून आली त्या ठिकाणी जाऊन, तपासणी करण्यात येत आहे.