३७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 05:43 AM2018-08-05T05:43:10+5:302018-08-05T05:43:19+5:30

डिपार्टमेंट आॅफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) ने शनिवारी मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय पातळीवरील अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या गँगच्या मुसक्या आवळल्या.

37 crore worth of substances seized | ३७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

३७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

Next

मुंबई : डिपार्टमेंट आॅफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) ने शनिवारी मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय पातळीवरील अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या गँगच्या मुसक्या आवळल्या. नवी मुंबई व रायगडमध्ये छापे मारून बंदी असलेले केटामाइन व मेथॅम्फेटामाइन हे २६५ किलो ड्रग जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत तब्बल ३७ कोटी रुपये आहे.
डीआरआयला सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या गँगच्या ७ आरोपींना अटक करण्यात आली. शुक्रवारी उशिरा रसायनी व तळोजा येथील केमिकल फॅक्टरीवर छापा मारण्यात आला. त्या ठिकाणी २५३ किलो केटामाइन जप्त करण्यात आले, तर १२ किलो मेथॅम्फेटामाइन नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून जप्त करण्यात आले. गेल्या तीन महिन्यांत डीआरआयने केलेल्या कारवाईमध्ये ही तिसरी मोठी कारवाई आहे.
डेट रेप ड्रग्ज नावाने हे पदार्थ ओळखले जातात व रेव्ह पार्टी आयोजित करणाºयांमध्ये हे पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. मलेशियामध्ये असलेल्या ड्रग्ज माफियाच्या माध्यमातून हे गोरखधंदे होत असल्याची माहिती डीआरआयच्या सूत्रांनी दिली.
>परदेशात तस्करी
मुंबई लगतच्या शहरांमध्ये वेअरहाउस भाडेतत्त्वावर घेऊन तिथे हे पदार्थ जमा करून ठेवले जातात व आवश्यकतेनुसार त्याचे वितरण केले जाते. रसायनी येथील फॅक्टरीमध्ये केटामाइनमध्ये भेसळ करून, त्यापासून नवीन अमली पदार्थ तयार करून त्याची परदेशात तस्करी केली जाते. अशी निर्यात करताना लाँड्रीसाठी लागणारी डिटर्जंट पावडर असल्याचे कागदोपत्री दाखविले जात असे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: 37 crore worth of substances seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.