शिक्षणासाठी ३,४९७ कोटी, महापालिकेच्या अर्थसंकल्पात गतवर्षीच्या तुलनेत केवळ २५ कोटींची वाढ
By रेश्मा शिवडेकर | Updated: February 3, 2024 13:54 IST2024-02-03T13:54:12+5:302024-02-03T13:54:30+5:30
BMC Budget: चार नवीन सीबीएसई शाळा, टॅब, ई-वाचनालये, खगोलशास्त्र प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम इत्यादी योजनांवर भर देत महापालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात शिक्षण विभागासाठी ३,४९७.८२ कोटी राखून ठेवले आहेत. चालू आर्थिक तुलनेत आगामी वर्षासाठी केवळ २५ कोटींची वाढ करण्यात आली आहे.

शिक्षणासाठी ३,४९७ कोटी, महापालिकेच्या अर्थसंकल्पात गतवर्षीच्या तुलनेत केवळ २५ कोटींची वाढ
- रेश्मा शिवडेकर
मुंबई : चार नवीन सीबीएसई शाळा, टॅब, ई-वाचनालये, खगोलशास्त्र प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम इत्यादी योजनांवर भर देत महापालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात शिक्षण विभागासाठी ३,४९७.८२ कोटी राखून ठेवले आहेत. चालू आर्थिक तुलनेत आगामी वर्षासाठी केवळ २५ कोटींची वाढ करण्यात आली आहे.
बजेटमध्ये २६६.७७ कोटी इतकी तरतूद पालिका शाळांच्या दुरुस्ती व बांधकामासाठी केली आहे. शाळांची स्वच्छता, देखभालीसाठी १४० रुपये खर्चण्यात येणार आहेत. विद्याथ्यांना मोफत शालेयपयोगी वस्तूंकरिता १६२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
राज्य सरकारकडे अनुदान थकलेले
प्राथमिक ४,७७९ कोटी
माध्यमिक १,१६६ कोटी
नव्या योजना व तरतूद
• शाळांसाठी ५३१ संगणक, ५४१ प्रिंटर व ५७४ स्कॅनरची खरेदी : १.३५ कोटी
• विद्यार्थ्यांचे लेखन व संभाषण कौशल्य वाढीसाठी नववी-दहावीच्या १९ हजार विद्यार्थ्यांना व्याकरणाची पुस्तके
• गणित व विज्ञान केंदाची २५ शाळांमध्ये उभारणी : ४.५० कोटी
• ग्रंथालयासाठी पुस्तके - ७५ लाख
• २०० शाळांमध्ये खुली व्यायामशाळा
• शिक्षकांच्या बदल्यांमधील हस्तक्षेप टाळण्याकरिता सॉफ्टवेअर निर्मिती
• सेंद्रिय शेतीची संकल्पना रुजविण्यासाठी १०० शाळांमध्ये किचन गार्डन
• पाचवी ते दहावीच्या सुमारे १.७० लाख विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शब्दकोश : ४.६९ कोटी
सुधारित भांडवली तरतूद २५७.३३ कोटींवर
- पालिकेच्या प्रशासकीय राजवटीत सादर होणारा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. गेल्या वर्षी पालिकेने ३.३४७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. • आढावा घेतल्यानंतर प्रशासनाने चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात सुधारणा केली. परिणामी, तरतूद १५० कोटींनी कमी होऊन ३,२०२ कोटींवर आली होती.
- त्याच वेळी, २०२३-२४च्या भांडवली अर्थसंकल्पात ३२० कोटीची प्रस्तावित तरतूद सुधारित करून २५७.३३ कोटी करण्यात आली. त्यामुळे आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात भांडवली कामासाठी ३३०.१९ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.