३४ मालमत्ताधारकांनी थकवला ५४८ कोटींचा कर, महापालिकेची वसुली मोहीम तीव्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 12:59 IST2026-03-08T12:59:05+5:302026-03-08T12:59:31+5:30
लिलाव प्रक्रियेमुळे ११ जण ताळ्यावर

३४ मालमत्ताधारकांनी थकवला ५४८ कोटींचा कर, महापालिकेची वसुली मोहीम तीव्र
मुंबई : महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने मोहीम तीव्र केली आहे. फक्त ३४ मालमत्ताधारकांकडे ५४८ कोटी ६९ लाख ८२ हजार ४८७ रुपये इतकी मोठी रक्कम थकीत असून, करवसुलीचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे.
दरम्यान, महापालिकेने ३४ मालमत्ताधारकांना नाेटीस पाठवल्या आहेत. यापैकी ११ मालमत्तांंची लिलाव प्रक्रिया सुरू होताच ५ मालमत्ताधारकांनी १० कोटी ४५ लाख रुपयांचा थकीत कर भरणा केला असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
सर्व थकबाकीदारांना कर भरणा करण्यासाठी २१ दिवसांची नोटीस बजाविण्यात आली आहे. या मुदतीत कर भरणा न केल्यास, लिलाव प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मालमत्ताकर थकविणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाई पुढेही सुरू राहणार आहे.
डॉ. अश्विनी जोशी,
अतिरिक्त आयुक्त (शहर), मुंबई महापालिका
विशेष माेहीम...
दरवर्षी कर थकविणाऱ्यांकडून वसुलीसाठी मुंबई महापालिका विशेष माेहीम हाती घेते. या अंतर्गत १०० टक्के करवसुलीचा प्रयत्न केला जाताे. यामुळे पालिकेच्या तिजाेरी माेठ्या प्रमाणात कर जमा हाेत असताे.