राज्यात कोरोनाच्या ३२८ नवीन रुग्णांचे निदान; मुंबईत ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 03:25 IST2023-04-11T03:25:48+5:302023-04-11T03:25:56+5:30
कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना सोमवारी राज्यात ३२८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले.

राज्यात कोरोनाच्या ३२८ नवीन रुग्णांचे निदान; मुंबईत ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू
मुंबई :
कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना सोमवारी राज्यात ३२८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले. त्यात मुंबईतील ५१ वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच २४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे, तर मुंबईतही सोमवारी ९५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून २८ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ५ रुग्णांना ऑक्सिजन बेड्सवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या मुंबईत १०२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून, सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या १४५४ इतकी असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.