लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी मिळवलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कठोर कारवाई सुरू केली आहे. २८ जिल्हा परिषदांमधील एकूण १०,९२२ दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी ६,२१८ जणांची पडताळणी पूर्ण झाली असून त्यापैकी ३१६ जणांविरुद्ध शिस्तभंग, दिलेल्या लाभांची वसुली तसेच निलंबन इत्यादी कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली.
शिस्तभंग, वसुली आणि निलंबनाची कारवाई भाजप आ. श्रीकांत भारतीय यांनी विधानसभेत लेखी प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाकडे लक्ष वेधले होते. त्याला उत्तर देताना मंत्री सावे यांनी स्पष्ट केले की, ३१६ अधिकारी-कर्मचारी दिव्यांग प्रमाणपत्र नसलेले, बनावट प्रमाणपत्र किंवा ४० टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असलेले आढळून आले आहेत. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग, दिलेल्या लाभांची वसूली आणि निलंबन अशी कारवाई करण्यात येत आहे. हजारो कर्मचाऱ्यांची तपासणी बाकी आहे.
दिव्यांग योजनांचा गैरवापर रोखण्यासाठी सर्व ३४ जिल्हा परिषदांना व्यापक पडताळणीचे आदेश दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. या कारवाईमुळे बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्यांना ठोस संदेश गेला असून पुढील काळात कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Web Summary : Maharashtra government acts against 316 officers/employees using fake disability certificates for government jobs. Disciplinary actions, recovery of benefits, and suspensions are underway after verification in 28 Zilla Parishads.
Web Summary : महाराष्ट्र सरकार ने सरकारी नौकरी के लिए जाली विकलांगता प्रमाण पत्र का उपयोग करने वाले 316 अधिकारियों/कर्मचारियों के खिलाफ कार्रवाई की। 28 जिला परिषदों में सत्यापन के बाद अनुशासनात्मक कार्रवाई, लाभों की वसूली और निलंबन जारी हैं।