सहा महिन्यांतच पालिकेच्या तिजोरीत ३,१०० कोटी
By सीमा महांगडे | Updated: October 5, 2025 09:02 IST2025-10-05T09:02:10+5:302025-10-05T09:02:33+5:30
मालमत्ता कर हे पालिकेच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असून यंदा मालमत्ता कराच्या बिलामध्ये वाढीव रेडी रेकनर दरानुसार जवळपास १६ टक्के वाढ केली आहे.

सहा महिन्यांतच पालिकेच्या तिजोरीत ३,१०० कोटी
- सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांतच महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाकडून जवळपास ३ हजार १०० कोटींचा मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. यंदा पालिकेने ७ हजार ७०० कोटींचा मालमत्ता कर संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूण उद्दिष्टाच्या जवळपास ४२ टक्के मालमत्ता कर जमा करण्यास महापालिकेला यश मिळाले आहे.
मालमत्ता कर हे पालिकेच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असून यंदा मालमत्ता कराच्या बिलामध्ये वाढीव रेडी रेकनर दरानुसार जवळपास १६ टक्के वाढ केली आहे. मात्र २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या सुधारित बिलांच्या छपाईच्या कामकाजाला काही तांत्रिक कारणास्तव उशीर झाला. परिणामी काही विभागात छापील देयके पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे मालमत्ता धारकांना बिलांचा भरणा करण्यासाठी ३ महिन्यांपेक्षा कमी कालावधी मिळाला. पहिल्या ६ महिलांची बिले भरण्यासाठी याआधी १३ ऑगस्ट शेवटची तारीख होती. मात्र मुंबईकरांना काही ठिकाणी बिले उशिरा मिळाल्यामुळे पालिकेने मुदतवाढ दिली आहे. तरीही पहिल्या सहा महिन्यांत एकूण उद्दिष्टांच्या ४२ टक्के कर गोळा करण्यात पालिकेला यश मिळाले आहे.
कर वेळेत न भरल्यास दंड
मुंबईकरांना महानगरपालिकेकडून मालमत्ता कर भरण्यासाठी नवीन मुदतवाढ दिली आहे. मात्र या मुदतवाढीच्या अंतिम तारखेनंतरही बिलांचा भरणा न केल्यास थकीत बिलावर नियमानुसार दंड करण्यात येणार असल्याचा इशारा महानगरपालिकेने दिला आहे.
अंतिम तारखी १ डिसेंबरपर्यंत
आर-उत्तर - अशोक वन दहिसर, एक्सर रोड
के-पूर्व - विले पार्ले (पू), जेबी नगर
एल - एलबीएस रोड, चुनाभट्टी सायन, कुर्ला
एन - विद्याविहार, घाटकोपर
एस - भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग
टी - मुलुंड, नाहूर
१ नोव्हेंबर २०२६पर्यंत मुदतवाढ
ए - कफ परेड, कुलाबा
बी - भेंडी बाजार, मस्जिद बंदर
सी - काळबादेवी, चिरा बाजार
डी - मलबार हिल, गिरगाव, ग्रांट रोड
इ - भायखळा, माझगाव, चिंचपोकळी
एफ-उत्तर - सायन कोळीवाडा, अँटॉप हिल
जी - दक्षिण -वरळी बीडीडी
एच-पूर्व - वांद्रे पूर्व, टीचर्स कॉलनी
एच-पश्चिम - सांताक्रूझ पश्चिम, खार
के-पश्चिम - चार बंगलो, गिल्बर्ट हिल, वर्सोवा
पी-दक्षिण - गोरेगाव, राम मंदिर, चिंचोली बंदर
पी-उत्तर - मालवणी, मढ, मार्वे रोड
आर-मध्य - बोरीवली, कुलपवाडी, वजिरा नाका
आर-दक्षिण - कांदिवली, पोयसर, चारकोप
एम-पूर्व/पश्चिम-मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, टिळकनगर
एफ-दक्षिण - नायगाव, परळ
जी-उत्तर - माटुंगा (प), दादर (प)