30 people poisoned by eating birthday cake | वाढदिवसाचा केक खाल्याने ३० जणांना झाली विषबाधा
वाढदिवसाचा केक खाल्याने ३० जणांना झाली विषबाधा

ठळक मुद्देकालपासून त्यांना उलटीचा त्रास सुरू झाला.आज सकाळी त्रास वाढल्याने ५ मुले,११ महिला आणि ५ पुरुषांना बोरिवली पश्चिम येथील भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले

मुंबई - दहिसर पश्चिम कांदरपाडा येथे झालेल्या कौटुंबिक वाढदिवसाच्या कार्यक्रमात केक आणि बिर्याणी खाल्यानेे ३० जणांना झाली विषबाधा झाली आहे.

दहिसर पश्चिम कांदरपाडा येथील आराध्य सिंग हिचा पहिला वाढदिवस मंगळवारी रोजी रात्री तीच्या कुटुंबाने साजरा केला. मात्र वाढदिवसाचा केक व बिर्याणी खाल्ल्यान तिचेे वडील अर्जुन सिंग यांच्या सुमारे ३० नातेवाईकांना विषबाधा झाली आहे. कालपासून त्यांना उलटीचा त्रास सुरू झाला. आज सकाळी त्रास वाढल्याने ५ मुले,११ महिला आणि ५ पुरुषांना बोरिवली पश्चिम येथील भगवती रुग्णालयात आणि ८ ते ९ रुग्णांना अंधेरी पूर्व मरोळ पाईपलाईन येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात असल्याची माहिती पालिकेच्या विधी व न्याय समिती अध्यक्षा शीतल मुकेश म्हात्रे यांनी लोकमतशी बोलतांना दिली. आज सकाळी विषबाधेचा त्रास झालेल्या येथील लहान मुलांना आपण स्वतः भगवती हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो.येथे लहान मुलांचे डॉक्टर उपलब्ध नसल्याने शताब्दी हॉस्पिटलमधून आपण डॉक्टर बोलावले अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: 30 people poisoned by eating birthday cake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.