मुस्लीम समाजाचे ३० नगरसेवक करणार महापालिकेत प्रतिनिधित्व; यात २० महिला उमेदवारांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 14:34 IST2026-01-20T14:31:08+5:302026-01-20T14:34:21+5:30
काँग्रेसच्या १४ जणांमध्ये सात नगरसेविका

मुस्लीम समाजाचे ३० नगरसेवक करणार महापालिकेत प्रतिनिधित्व; यात २० महिला उमेदवारांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महापालिका निवडणुकीत मुस्लीम समाजाचे ३० उमेदवार निवडून आले आहेत. ते विविध राजकीय पक्षांकडून रिंगणात उतरले होते. सर्वाधिक १४ काँग्रेसचे, तर त्या खालोखाल एमआयएमचे सात मुस्लीम उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसचे एकूण २४ नगरसेवक विजयी झाले आहेत, त्यात ५८ टक्के म्हणजे १४ जागांवर मुस्लीम समाजाचे उमेदवार विजयी झाले. एमआयएमच्या आठ विजयी उमेदवारांपैकी सात, तर राष्ट्रवादी (अजित पवार) चे तीनही उमेदवार मुस्लीम समाजाचे आहेत.
काँग्रेसच्या १४ जणांमध्ये सात नगरसेविका
समाजवादी पक्षाचे दोन्ही निवडून आलेले उमेदवार मुस्लीम समाजाचे आहेत. शिंदेसेनेची एक मुस्लीम महिला उमेदवार विजयी झाली आहे. उद्धवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. नगरसेवकपदी निवडून आलेल्या ३० मुस्लीम उमेदवारांमध्ये २० महिला आहेत. काँग्रेसच्या १४ जणांमध्ये सात नगरसेविका आहेत. एमआयएमच्या सातपैकी पाच, उद्धवसेनेच्या तीन पैकी दोन महिला, राष्ट्रवादी (अजित पवार) च्या तीन पैकी तीन महिला, समाजवादी पक्षाच्या दोन महिला, शिंदेसेनेची एकमेव, अशा २० महिला उमेदवारांचे महापालिकेत पदार्पण झाले आहे.