दंगल प्रकरणातील २९ शिवसैनिक निर्दोष मुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 06:37 IST2025-11-14T06:37:01+5:302025-11-14T06:37:25+5:30
Court News: २००५ दंगल प्रकरणात तत्कालीन शिवसेनेच्या २९ कार्यकर्त्यांची विशेष खासदार-आमदार न्यायालयाने गुरुवारी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. नारायण राणेंची जुलै २००५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याची घोषणा केली तेव्हा ही राजकीय दंगल झाली होती.

दंगल प्रकरणातील २९ शिवसैनिक निर्दोष मुक्त
मुंबई - २००५ दंगल प्रकरणात तत्कालीन शिवसेनेच्या २९ कार्यकर्त्यांची विशेष खासदार-आमदार न्यायालयाने गुरुवारी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. नारायण राणेंची जुलै २००५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याची घोषणा केली तेव्हा ही राजकीय दंगल झाली होती.
विशेष न्यायालयाने खा. रवींद्र वायकर आणि मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांचीही निर्दोष मुक्तता केली. मुक्तता झालेल्या अन्य नेत्यांत अशोक केळकर, प्रवीण शेट्ये, महेश सावंत, ज्योती भोसले, स्वाती शिंदे, अजित कदम, स्नेहल जाधव, प्रीती देवहरे, सुधा मेहेर, श्रीधर शेलार, दगडू सकपाळ आणि विशाखा राऊत यांचाही समावेश आहे.
‘‘दोन राजकीय गटांतील वैरामुळे मुंबई शहर धोक्यात आले होते. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले होते. तरीही काही जण जखमी झाले व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.