बदलापुरात २८ किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:06 IST2021-04-26T04:06:30+5:302021-04-26T04:06:30+5:30

मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई महानगरात मादक पदार्थविरोधातील कारवाईचे सत्र सुरूच असून, रविवारी बदलापूर येथील ...

28 kg cannabis seized in Badlapur | बदलापुरात २८ किलो गांजा जप्त

बदलापुरात २८ किलो गांजा जप्त

मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई महानगरात मादक पदार्थविरोधातील कारवाईचे सत्र सुरूच असून, रविवारी बदलापूर येथील एका वाहनातून २८ किलो गांजा व भांगचे पदार्थ जप्त केले. याप्रकरणी जयप्रभात राठोड याला ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी सुनील भंडारी हा फरारी झाला असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

बदलापुरात एके ठिकाणी नशिल्या पदार्थांची तस्करी केली जात असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पाळत ठेवून एका ठिकाणी लावलेल्या टोयाटो इनोव्हाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रत्येकी २ किलो वजनाची नशील्या पदार्थाची १४ पाकिटे मिळाली. त्यापैकी ९ पाकिटे कारच्या मागील बाजूला लपवली होती, तर ५ पाकिटे बोनेटमध्ये ठेवण्यात आली होती. इनोव्हात असलेल्या राठोडला ताब्यात घेतले असून, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे, असे सांगण्यात आले

Web Title: 28 kg cannabis seized in Badlapur