26.28 percent employees in Vidarbha state - Finance Minister | राज्याच्या प्रशासनात २६.२८ टक्के कर्मचारी विदर्भातील - अर्थमंत्री
राज्याच्या प्रशासनात २६.२८ टक्के कर्मचारी विदर्भातील - अर्थमंत्री

मुंबई : लोकसंख्येच्या तुलनेत राज्य सरकारच्या प्रशासनात आता विदर्भातील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या २६.२८ टक्के झाली आहे,
अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
राज्याच्या एकूण लोकसंख्येत विदर्भाची लोकसंख्या २३ टक्के आहे ; मात्र त्या तुलनेत नोकरीत या भागातल्या लोकांना वाटा मिळत नाही या आरोपाला उत्तर देताना ते म्हणाले, मुळात २३ टक्के लोकसंख्या हे प्रमाण देखील आता कमी झाले आहे. अनेक तरुण नोकरीसाठी विदर्भाच्या बाहेर जात आहेत. मात्र २३ टक्के लोकसंख्या हे प्रमाण गृहीत धरले तरीही नोकरीतला वाटा २६.२८ टक्के झाला आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.
मुळात विभागवार नोकऱ्यांचे प्रमाण सांगू नये, यामुळे विनाकारण प्रादेशिक वाद तयार होतात असे असताना हे प्रमाण जाहीर केल्यामुळे राज्यात आता विभागवार संघर्ष अटळ होतील, शिवाय अर्थमंत्र्यांनी आता मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्टÑ, कोकणातही लोकसंख्येनुसार शासकीय नोकºयांचे प्रमाण किती हे जाहीर करावे, अशी मागणी विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली.
आमची नावे देऊ नका, कारण त्याला ही विभागवार रंग येईल तो येऊ नये असे आम्हाला वाटते असेही काही आमदार म्हणाले.

विरोधकांचा आरोप

विदर्भातील कर्मचाºयांना सरकारी नोकरीत अत्यंत कमी वाटा मिळतो, असा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला होता. त्याला वित्तमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात प्रत्युत्तर दिले.


Web Title:  26.28 percent employees in Vidarbha state - Finance Minister
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.