Join us

तीन रुपयांसाठी गमावले २५ हजार; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 04:09 IST

रविवारी रात्री ८ वाजता त्या तिकिटांचे पैसे एकत्र जमा करून ठेवत होत्या.

मुंबई : जत्रेतील आकाशपाळण्याची तिकीट विक्री करणाऱ्या महिलेला ३ रुपयांसाठी २५ हजारांचा फटका बसल्याची घटना बोरीवलीत घडली.

तक्रारदार या कांदिवलीत राहातात. बोरीवलीत भरलेल्या एका जत्रेमध्ये आकाशपाळण्याच्या तिकीट विक्रीची जबाबदारी त्यांच्याकडे होती. रविवारी रात्री ८ वाजता त्या तिकिटांचे पैसे एकत्र जमा करून ठेवत होत्या. ४१६ तिकिटांचे २५ हजार रुपये जमा झाले होते. त्याच दरम्यान काही मुले तेथे आली. त्यांनी महिलेला त्यांचे पैसे पडल्याचे सांगितले. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले. तर त्यातील एका मुलाने ३ रुपये पडल्याचे दाखवले.

पैसे घेण्यासाठी त्या वाकताच अन्य मुलाने पैशांची पिशवी घेऊन पळ काढला. त्यापैकी विष्णु अशोक साळुंके (२८) याला अटक करण्यात आली. अन्य साथीदारांचाही एमएचबी पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :चोरीपोलिस