मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील २५ बोटी आश्रयासाठी पोहोचल्या दिघी बंदरला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 03:33 PM2021-05-16T15:33:37+5:302021-05-16T15:34:35+5:30

चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मच्छीमारांसाठी तसेच समुद्रकिनारी रहिवाशी असलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केला होता

25 boats from Mumbai city and Mumbai suburbs reached Dighi port for shelter | मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील २५ बोटी आश्रयासाठी पोहोचल्या दिघी बंदरला 

मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील २५ बोटी आश्रयासाठी पोहोचल्या दिघी बंदरला 

googlenewsNext

मुंबई - रायगड जिल्ह्यातील मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या 96 नौका समुद्रकिनारी सुखरूप पोहोचल्या आहेत. दिघी बंदर येथे मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील 25 बोटी आश्रयासाठी आल्या आहेत तर परप्रांतीय कोणतीही नौका रायगड जिल्ह्यात आश्रयाला आलेली नाही, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त सुरेश भारती यांनी दिली. 

चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मच्छीमारांसाठी तसेच समुद्रकिनारी रहिवाशी असलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केला होता. मच्छीमार आणि नागरिकांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून रायगड जिल्ह्यातील सर्व नौका समुद्रकिनारी सुखरूप परत आल्या आहेत. त्यामुळे, मोठं तुर्तास या नौकांमुळे चिंतेत असलेल्या नागरिकांना आणि कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Web Title: 25 boats from Mumbai city and Mumbai suburbs reached Dighi port for shelter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.