Join us
Daily Top 2Weekly Top 5

२४ तास पाण्याचे वचन होते, दिले फक्त ५ तास; काँग्रेसचे महायुतीवर १३ पानी आरोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 09:30 IST

महायुतीने कंत्राटदारांसाठीच केले काम, प्रचारात हेच मुद्दे वापरणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तीन वर्षे नऊ महिने  मुंबई महापालिकेवरील प्रशासकाच्या माध्यमातून महायुतीने मुंबईकरांना लुटले आहे. केवळ कंत्राटदार व लाडके उद्योगपती यांना मुंबई विकण्याचे काम केले आहे. मुंबईकरांना २४ तास पाण्याचे वचन दिले, मात्र फक्त ५ तास पाणी मिळते. मुंबई हे भ्रष्ट ‘महायुती काॅर्पोरेशन’ बनले आहे, असा घणाघात मुंबई काँग्रेसने शुक्रवारी महायुतीवर केला. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मिठी नदीच्या काठी झालेल्या कार्यक्रमात महायुतीवर १३ पानी आरोपपत्र दाखल केले.

माजी मंत्री आ. अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, आ. भाई जगताप, आ. अमिन पटेल, आ. डॉ. ज्योती गायकवाड, मुख्य प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते. महायुतीने पालिकेच्या ठेवी लुटल्या. रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. वाहतूक कोंडी, वायुप्रदूषण, सार्वजनिक वाहतूक, पाणी, आरोग्य, शिक्षण या सर्व मुद्द्यांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

जाहीरनामा लवकरचमहापालिकेच्या शाळा खासगी लोकांना दिल्या जात आहेत, असा आरोप गायकवाड यांनी केला. आमचा  जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध करणार आहोत; पण महायुतीने काय केले, हे या आरोपपत्राच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर आणल्याचे त्यांनी सांगितले. 

‘वंचित’चा उल्लेख टाळलावंचित बहुजन आघाडीसोबत युतीच्या चर्चेची सद्य:स्थिती काय आहे, या  प्रश्नावर ‘सचिन सावंत यांना विचारा,’ असे मोघम उत्तर गायकवाड यांनी दिले. वंचित व समविचारी पक्षांशी आमचा संवाद सुरू आहे, एवढेच त्यांनी सांगितले. 

आरोपत्रातील मुख्य मुद्दे२४ तास पाण्याचे वचन, मात्र फक्त ५ तास पाणीबेस्टचे भाडे १०० टक्के वाढवून मुंबईकरांच्या खिशाला चाट, बेस्टच्या खासगीकरणाचा घाट१७ हजार कोटींच्या काँक्रीट रस्त्यांचा डंका पिटला; पण ७२३ रस्त्यांची कामे अजूनही सुरू झालेली नाहीतधारावी अदानींची, मिठी नदी अदानींची, विमानतळ-बंदरही अदानींचेच; मग मुंबई ‘अदानी सिटी’ झाली तर आश्चर्य कशाचे?महापालिका रुग्णालयांची प्रचंड दुरवस्थासार्वजनिक सुरक्षेचा फाटला ढोल, मुंबईत हरवली १४५ मुलेखड्ड्यांमुळे कोणतेही मृत्यू झाले नाहीत, असे महायुतीचे निलाजरे उत्तरगुजरातच्या प्रेमात मुंबईचे तरुण वाऱ्यावर, महायुतीने रोजगार पळवले.बिल्डरांच्या फायद्यासाठी मराठी शाळा बंद केल्या.कचरा संकलनामध्ये ३ हजार कोटींचा घोटाळा.

English
हिंदी सारांश
Web Title : Promises 24-hour water, delivers 5: Congress slams alliance with chargesheet.

Web Summary : Congress accuses ruling alliance of corruption in Mumbai municipality. Allegations include reduced water supply, BEST fare hikes, stalled roadworks, favoring specific businesses, neglecting healthcare, and closing Marathi schools for builder profits. A 13-point chargesheet was presented.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२६महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६काँग्रेसशिवसेना