Join us  

इमारत कोसळल्याच्या २ हजार ७०४ दुर्घटनांत २३४ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 6:15 AM

डोंगरी येथील केसरबाई इमारत कोसळली असतानाच अशाच पडझडीच्या म्हणजे २०१३ ते २०१८ या कालावधीत इमारत कोसळून झालेल्या २ हजार ७०४ दुर्घटनांत २३४ बळी गेले

मुंबई : डोंगरी येथील केसरबाई इमारत कोसळली असतानाच अशाच पडझडीच्या म्हणजे २०१३ ते २०१८ या कालावधीत इमारत कोसळून झालेल्या २ हजार ७०४ दुर्घटनांत २३४ बळी गेले असून, ८४० जखमी झाले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना माहिती अधिकारान्वये महापालिकेकडून प्राप्त कागदपत्रातून ही बाब समोर आली आहे.>2013मध्ये ५३१ दुर्घटना घडल्या. १०१ लोकांचा मृत्यू झाला.>2014मध्ये ३४३ दुर्घटना घडल्या. २१ लोकांचा मृत्यू झाला.>2015मध्ये ४१७ दुर्घटना घडल्या. १५ लोकांचा मृत्यू झाला.>2016मध्ये ४८६ दुर्घटना घडल्या. २४ लोकांचा मृत्यू झाला.>2017मध्ये ५६८ दुर्घटना घडल्या. ६६ लोकांचा मृत्यू झाला.>2018मध्ये ३५९ दुर्घटना घडल्या. ७ लोकांचामृत्यू झाला.

टॅग्स :इमारत दुर्घटनाजे. जे. रुग्णालय