चार महिन्यांत २२ वाघ अन् ४० बिबट्यांचा मृत्यू; तीन वर्षांत १०७ वाघ दगावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 10:03 IST2025-07-05T10:02:59+5:302025-07-05T10:03:15+5:30

मुंबई : राज्यात जानेवारी ते एप्रिल २०२५ या काळात २२ वाघांचा मृत्यू झाला अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी ...

22 tigers and 40 leopards die in 2 months; 107 tigers killed in three years | चार महिन्यांत २२ वाघ अन् ४० बिबट्यांचा मृत्यू; तीन वर्षांत १०७ वाघ दगावले

चार महिन्यांत २२ वाघ अन् ४० बिबट्यांचा मृत्यू; तीन वर्षांत १०७ वाघ दगावले

मुंबई : राज्यात जानेवारी ते एप्रिल २०२५ या काळात २२ वाघांचा मृत्यू झाला अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२४ या दरम्यान राज्यात विविध कारणांनी १०७ वाघांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले.

यापैकी नैैसर्गिक कारणामुळे १३, विजेच्या धक्क्यामुळे ४, रस्ता, रेल्वे व विहीर अपघातात चार आणि अज्ञात कारणामुळे १ वाघ दगावला, असे नाईक यांनी सांगितले. याच काळात ४० बिबट्यांचाही मृत्यू झाला.

त्यात नैसर्गिक कारणाने ८, रस्ता, रेल्वे आणि विहीर अपघातात २०, शिकार ३, अज्ञात कारणामुळे ९ बिबटे दगावले.

याच कालावधीत नैसर्गिक कारणांमुळे २३, विजेच्या धक्क्यामुळे ४, शिकार ४, रस्ता अपघात, कुत्र्यांच्या हल्ल्यात आणि विहीर अपघातात २४ आणि अज्ञात कारणामुळे ६ अशा एकूण ६१ अन्य वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहितीही वनमंत्री गणेश नाईक सभागृहात  दिली.

राज्यात तीन वर्षांत १०७ वाघ दगावले

जानेवारी ते एप्रिल २०२५ या काळात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१ व्यक्तींचा मृत्यू झाला.

२०२२ ते २०२४  दरम्यान राज्यात ७०७ वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला.

वीज प्रवाहामुळे वाघ आणि अन्य वन्यप्राण्यांचे मृत्यू होऊ नयेत यासाठी वन विभाग आणि राज्य वीज महामंडळ मिळून प्रतिबंधात्मक उपाय करते.

Web Title: 22 tigers and 40 leopards die in 2 months; 107 tigers killed in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ