Join us  

२ हजार टीसीने ५७४ श्रमिक विशेष ट्रेनमध्ये दिली सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 6:12 PM

७ लाखांहून अधिक मजूर पोहचले आपल्या मूळगावी

 

मुंबई : भारतीय रेल्वे मार्गावर श्रमिक विशेष ट्रेन धावत आहेत. यामधून मजुरांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी अनेक रेल्वे कर्मचारी काम करत आहेत. या मजुरांना प्रवासादरम्यान जेवणाची आणि त्यांच्या सुरक्षित प्रवास होण्याकरिता मध्य रेल्वेचे दोन हजार तिकिट तपासणी कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी  अहोरात्र परिश्रम घेऊन मजुरांना सुखरूप घरी पोहचविले आहे.

भारतीय रेल्वेद्वारे कामगार दिनापासून देशभरात विविध भागात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मुळगावी पोहोचण्यासाठी श्रमिक विशेष ट्रेन चालवित आहेत. मागील २९ दिवसात मध्य रेल्वेने ५७४ श्रमिक ट्रेन चालविण्याल्या आहेत. यातून ७ लाखांपेक्षा जास्त मजुरांनी आपल्या घरी पोहचले आहेत. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेची प्रवासी वाहतुक २३ मार्चपासून बंद करण्यात आली आहे. मात्र अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी श्रमिक विशेष ट्रेन चालविण्यात येत आहेत. मध्य रेल्वेतून सुटणा-या ५७४ श्रमिक विशेष गाड्यांसह १ हजार ८४० श्रमिक विशेष गाड्यांमध्ये सेवेसाठी मध्य रेल्वेने २ हजार ९ तिकिट तपासणी कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. ज्यामध्ये नागपूर विभागातील ४ आणि पुणे विभागातील १० अशा १४ महिला तिकीट तपासणी कर्मचारीसुद्धा  समावेश आहे. या श्रमिक विशेष गाड्याचे संचालनची महत्वपूर्ण जबाबदारी २ हजार ९ तिकिट तपासणी कर्मचार्‍यांवर  होती.

तिकीट तपासणी कर्मचार्‍यांनी कोरोनाची भीती न पत्करता सेवा देण्यासाठी तत्पर, स्थलांतरित मजुरांची  काळजीने, करुणापूर्वक आणि सौजन्याने हाताळणे, अनेकदा मदत करणे, लहान मुलांना डब्ब्यांपर्यंत घेऊन जाणे, ज्येष्ठ नागरिकांना आरामदायक बोर्डिंगसाठी व्हील चेअरवर नेणे आणि  गर्भावस्थेतील महिलांना जवळच्या रूग्णालयात पाठविण्यासाठी वाहतुकीसह त्वरित मदत करण्यात मोठे योगदान या दोन हजार टीसीचे आहेत.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यारेल्वेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस