Join us  

मंगल प्रभात लोढांवर २०० कोटींचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 3:42 AM

मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी गुरुवार सायंकाळपर्यंत मलबार हिल विधानसभा क्षेत्रात चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

मुंबई : मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी गुरुवार सायंकाळपर्यंत मलबार हिल विधानसभा क्षेत्रात चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकेकाळचे बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या लोढा यांनी आपल्यावर तब्बल दोनशे कोटींचे कर्ज असल्याचे निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या कुटुंबाची एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता ४४१ कोटींची असल्याचे नमूद केले आहे. या जोडीला लोढा पती-पत्नीच्या नावे एकूण २८३ कोटींचे कर्ज असल्याचीही माहिती दिली आहे. लोढा कुटुंबीयांकडे एकूण ११ किलो सोने असून १७५ किलोंच्या आसपास चांदी आहे. तर, १४ लाख रुपयांची जग्वार कार असून बॉण्ड आणि शेअर्समध्ये अन्य गुंतवणूक आहे. लोढा कुटुंबीयांचे दक्षिण मुंबईत पाच फ्लॅट आहेत. राजस्थानातही त्यांचा प्लॉट आहे. १० वर्षांपूर्वी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत स्थावर २४ आणि जंगम २४ अशी ४८ कोटींची मालमत्ता आणि ७ कोटींचे कर्ज असल्याचे लोढा यांनी सांगितले होते. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी २०० कोटींची संपत्ती जाहीर केली होती. तर आता त्यांच्याकडे ४४१ कोटी म्हणजे दुप्पट वाढ झाली आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भाजपामालाबार हिल