चुनाभट्टी येथे २० लाखांची घरफोडी
By Admin | Updated: August 25, 2014 01:16 IST2014-08-25T01:16:41+5:302014-08-25T01:16:41+5:30
घरात कोणीच नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी चुनाभट्टी येथे राहणाऱ्या विशाल छेडा यांच्या घरात घुसून २० लाखांचा ऐवज लंपास केला

चुनाभट्टी येथे २० लाखांची घरफोडी
मुंबई : घरात कोणीच नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी चुनाभट्टी येथे राहणाऱ्या विशाल छेडा यांच्या घरात घुसून २० लाखांचा ऐवज लंपास केला. याबाबत त्यांनी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. येथील काजवे रोेड परिसरातील भागनेरी सोसायटीमध्ये छेडा राहतात.
शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते कुटुंबीयांसोबत एका नातेवाइकाकडे गेले होते. याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटामध्ये असलेले सोन्याचे आणि हिरेजडित दागिने असा २० लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. रात्री आठच्या सुमारास छेडा कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी याबाबत सायन पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाची पाहाणी करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)