घाटकोपरमध्ये स्लॅब कोसळून २ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 14:56 IST2019-05-25T14:53:28+5:302019-05-25T14:56:09+5:30
ही घटना आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

घाटकोपरमध्ये स्लॅब कोसळून २ जण जखमी
ठळक मुद्देलक्ष्मी शिवाजी कुटे (५७) आणि शिवाजी कुटे (६०) असं जखमींची नावं दक्षता को.ऑप. सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील प्लास्टर असलेला स्लॅब कोसळला.दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.
मुंबई - घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई आंबेडकर नगर येथील एका इमारतीचा स्लॅब कोसळून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. लक्ष्मी शिवाजी कुटे (५७) आणि शिवाजी कुटे (६०) असं जखमींची नावं असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून ही घटना आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
दक्षता को.ऑप. सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील प्लास्टर असलेला स्लॅब कोसळला. दरम्यान रमाबाई कॉलनीमधील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळला. या घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.
(बातमीतील फोटो घटनास्थळाचा नाही)