वीजेच्या धक्क्याने २ पालिका कर्मचाऱ्यांचा मृत्यू, तर ५ जण जखमी; मुंबईतील धक्कादायक घटना
By मुकेश चव्हाण | Updated: October 19, 2020 15:48 IST2020-10-19T15:48:04+5:302020-10-19T15:48:13+5:30
मुंबईतील कुर्ला परिसरातील सुमननगरजवळ मेट्रोचे काम सुरू आहे.

वीजेच्या धक्क्याने २ पालिका कर्मचाऱ्यांचा मृत्यू, तर ५ जण जखमी; मुंबईतील धक्कादायक घटना
मुंबई: मुंबईतील कुर्ला परिसरातील सुमननगरजवळ पाण्याच्या पाईपलाईनच काम सरु असताना वीजेचा धक्का लागून महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तसेच ५ कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी कर्मचाऱ्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईतील कुर्ला परिसरातील सुमननगरजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. याचदरम्यान (आज सकाळी) सोमवारी पाण्याची पाईपलाईन फुटल्याने दुरुस्तीच काम सुरु होते. यावेळी अचानक 7 कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसला. यात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर पाच जण हे यातून थोडक्यात बचावले असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
महेश जाधव (40), राकेश जाधव(39), नरेश अधांगळे(40), नाना पुकळे (41), अनिल चव्हाण (43) अशी जखमींची नावं असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अमोल काळे (40) आणि गणेश दत्तू (वय 45) यांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.