२ कोटींच्या मोरपिसांच्या तस्करीचा पर्दाफाश; डीआयआरची कारवाई
By मनोज गडनीस | Updated: February 14, 2024 19:57 IST2024-02-14T19:55:46+5:302024-02-14T19:57:15+5:30
न्हावा-शेवा बंदरातून चीन येथे काही सामानाची निर्यात करण्यासाठी दाखल झाले.

२ कोटींच्या मोरपिसांच्या तस्करीचा पर्दाफाश; डीआयआरची कारवाई
मनोज गडनीस, मुंबई - तब्बल २८ लाख मोरपिसांच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांना यश आले आहे. न्हावा-शेवा बंदरात अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. डीआरआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्हावा-शेवा बंदरातून चीन येथे काही सामानाची निर्यात करण्यासाठी दाखल झाले.
दरवाजाच्या बाहेर ठेवण्यात येणारे पायपुसणे असे या सामानाचे वर्णन करत पायपुसण्याची निर्यात करण्यात येण्याची कागदोपत्री नोंद करण्यात आली होती. मात्र, काही पक्ष्यांची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांना तब्बल २८ लाख मोरपिसे त्या सामानामध्ये आढळून आली. याची किंमत २ कोटी १ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी निर्यातदाराला अटक करण्यात आली असून त्याने या तस्करीची कबुली अधिकाऱ्यांना दिली आहे.