राज्यात १.८२ लाख कुपोषित बालकांची नोंद; २,७७८ तीव्र कुपोषित बालके मुंबई उपनगरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 08:16 IST2025-07-04T08:15:08+5:302025-07-04T08:16:31+5:30

राज्यात १ लाख ८२ हजार ४४३ कुपोषित बालके आढळली असून त्यापैकी ३० हजार ८०० बालके तीव्र कुपोषण श्रेणीत असून १ लाख ५१ हजार ६४३ बालके मध्यम कुपोषित श्रेणीत असल्याचे राज्य सरकारने गुरुवारी विधानसभेत लेखी उत्तरात मान्य केले.

1.82 lakh malnourished children registered in the state; 2,778 severely malnourished children in Mumbai suburbs | राज्यात १.८२ लाख कुपोषित बालकांची नोंद; २,७७८ तीव्र कुपोषित बालके मुंबई उपनगरात

राज्यात १.८२ लाख कुपोषित बालकांची नोंद; २,७७८ तीव्र कुपोषित बालके मुंबई उपनगरात

मुंबई : राज्यात १ लाख ८२ हजार ४४३ कुपोषित बालके आढळली असून त्यापैकी ३० हजार ८०० बालके तीव्र कुपोषण श्रेणीत असून १ लाख ५१ हजार ६४३ बालके मध्यम कुपोषित श्रेणीत असल्याचे राज्य सरकारने गुरुवारी विधानसभेत लेखी उत्तरात मान्य केले.

राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उपाययोजनांबाबत काँग्रेसचे विकास ठाकरे व अन्य सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरात महिला व बाल विकास विभागाने कुपोषित बालकांची आकडेवारी दिली. राज्यात सर्वाधिक तीव्र कुपोषित बालके (२ हजार ७७८) मुंबई उपनगरात असल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे.

पोषण श्रेणीची मुंबई महापालिकेने नोंदच केली नाही!

पोषण श्रेणीनुसार मुंबई महापालिकेने ६ हजार ९२ बालकांच्या पोषण श्रेणीची नोंदच केली नसल्याचे व सर्वाधिक कुपोषित बालके मुंबईच्या उपनगरात असल्याचे निदर्शनास आले आहे हे खरे आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरील लेखी उत्तरात महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी अंशतः खरे आहे, असे मान्य केले आहे.

अंगणवाडी सेविकांची पदे रिक्त

राज्यात अंगणवाडी सेविका व मदतनिसांची सुमारे ३ हजार ६०२ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे बाल विकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिकांचीही पदे रिक्त आहेत. ही रक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.

जिल्हा मध्यम कुपोषित बालके  तीव्र कुपोषित बालके

मुंबई उपनगर    १३,४५७        २,८८७

ठाणे    ७,३६६ ४४४

नाशिक         ८,९४४  १,८५२

पुणे    ७,४१० १,६६६

धुळे    ६,३७७ १,७४१

छत्रपती संभाजीनगर     ६,४८७  १,४३९

नागपूर         ६,७१५  १,३७३

Web Title: 1.82 lakh malnourished children registered in the state; 2,778 severely malnourished children in Mumbai suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.